Breaking News

आरोग्य शिबिरास नवघरमध्ये प्रतिसाद

उरण : वार्ताहर

लायन्स क्लब ऑफ उरण व ग्रामपंचायत नवघर यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 280 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे वाटप करण्यात आली. लायन्स क्लब ऑफ उरणचे अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, डॉ. संतोष गाडे, डॉ. प्रिती गाडे, डॉ. चेतन पाटील, डॉ. शिवानी गाडे, डॉ. प्रणाली पाटील, डॉ. आकाश भारती यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना पनवेलच्या लाइफ लाइन हॉस्पिटलची टीम तसेच लायन आय फाऊंडेशन चौंडी टीम आणि गाडे हॉस्पिटलमधील नर्सिंग स्टाफने मदत केली. कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे सदानंद गायकवाड, संजीव अग्रवाल, नरेंद्र ठाकूर, दत्तात्रय नवाले, मनीष घरत, प्रमिला गाडे, शीतल तेलंगे, उत्तरा रुइकर, आरती चौगुले, सपना गायकवाड, उपाध्यक्ष प्रकाश नाईक, सचिव समीर तेलंगे, खजिनदार संध्यारानी ओहोल व इतर लायन सदस्य उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी किरण केणी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचार्‍यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply