Tuesday , February 7 2023

सोनारी येथे विविध उपक्रम

उरण : वार्ताहर

कै. रामा पुना कडू यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा रवींद्र कडू व सून वनिता कडू यांनी सोनारी येथील वैकुंठभूमी (स्मशानभूमी)जवळ लाकडे ठेवण्यासाठी स्वखर्चाने एक रूम बांधली असून, ती ग्रामसुधारणा मंडळाकडे नुकतीच हस्तांतरित केली. या कार्यक्रमास माजी सरपंच महेश कडू, ग्रामसुधारणा मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश तांडेल, माजी अध्यक्ष हरिभाऊ कडू आदी उपस्थित होते. याचबरोबर कै. रामा कडू यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा मधुकर कडू व सून शैला कडू यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे खंडोबा मंदिरात कविसंमेलन घेण्यात आले. रायगडभूषण कवी, लेखक एल. बी. पाटील, वसंत कडू, परशुराम पाटील, कै. रामा कडू यांच्या धर्मपत्नी दुर्गाबाई आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply