पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील सांगुर्ली ग्रामपंचायतीत चार प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) आणि बुधवारी (दि. 30) आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे दाखल केले. यामध्ये प्रभाग क्र. 2मध्ये सांगुर्लीतून भाजपचे संतोष पारधी, निर्मला ठोकळ, वनिता कातकरी, संगीता वाघमारे; प्रभाग क्र. 3मध्ये तुरमाळे, चिरवत येथून यशवंत हातमोडे, अस्मिता हातमोडे; प्रभाग क्र. 4मध्ये तुरमाळे येथून शरद वांगिलकर, दर्शना हातमोडे, मेघा जाधव हे उमेदवार आहेत तसेच प्रभाग क्र. 1मधून चिंचवण येथे भाजप, शेकाप, शिवसेना या स्थानिक पातळीवरील युतीचे वसंत पाटील, सुवर्णा पाटील, पद्माकर कातकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी सांगुलीचे माजी सरपंच दत्तात्रेय हातमोडे, माजी सदस्य विष्णू ठोकळ, जगदिश पाटील, शाम ठोंबरे, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, तसेच जगन्नाथ हातमोडे, निलेश वांगिलकर, भास्कर पाटील, युवा कार्यकर्ते अॅड. निलेश हातमोडे, प्रतिक पाटील, रवींद्र जाधव, अनिल हातमोडे, राजेंद्र हातमोडे, विशाल गायकर, मोतिराम म्हात्रे आदी उपस्थित होते.