Breaking News

उरण येथे मोटरसायकल रॅली

उरण : प्रतिनिधी

उरण वाहतूक पोलिसांच्या वतीने हेल्मेट सुरक्षा सप्ताहाच्या निमित्त उरण शहर व तालुक्यातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले असून, मोटरसायकल चालकांनी गाडी चालवितांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी हेल्मेटचा वापर करावा, या जनजागृती व प्रबोधनासाठी उरण येथील शासकीय विश्रामगृह येथे दुचाकी स्वारांसाठी उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली हेल्मेट वाटपाचा उपक्रम उत्साहात झाला. या वेळी दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरूनच प्रवास करावा, आत्तापर्यंत जास्तीत जास्त होणार्‍या अपघातात दुचाकी वाहनांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी उपस्थित दुचाकी मार्गदर्शनात सांगितले. चालकाने हेल्मेट नियमित वापरावे, उरण तालुक्यात नियमित वाहनांची वर्दळ असल्याने डोक्यात हेल्मेट असल्यास होणार्‍या अपघातात कोणत्याही दुचाकी स्वार व्यक्तीचा जीव वाचू शकतो. डोक्याला दुखापत होण्याचे टळल्याने अपघातात शरीराच्या इतर ठिकाणी इजा झाल्यास उपचार घेऊन वाहनचालकाच्या जिवितास धोका पोहोचत नाही. त्याचप्रमाणे दुचाकी वाहन चालवितांना मर्यादित वेगातच चालविल्यास दुर्घटना आपली सुरक्षितता राहते. असेही जगदीश कुलकर्णी यांनी नमूद केले. या शिवाय वाहन चालवताना घ्यावयाची दक्षता याबाबतही त्यांनी मौलाचे मार्गदर्शन केले. तर हेल्मेट सुरक्षा सप्ताहात उरण शहरातून काढण्यात आलेल्या दुचाकीस्वारांच्या रॅलीला वरिष्ठ निरीक्षक कुलकर्णी यांनी हिरवा शेंडा दाखवून संपूर्ण उरण शहरात एका ओळीने दोन अशा हेल्मेट घातलेल्या महिला व पुरुष दुचाकीस्वारांनी हेल्मेटचे महत्व सांगणार्‍या उरण वाहतूक शाखेच्या उपक्रमास योग्यतेने दाद देऊन हेल्मेट सुरक्षा सप्ताहाच्या रॅलीत सहभागी होऊन शहरातील नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटवून दिले. या वेळी आरएफएसचे गिरीश पाटील, उरण मोटार प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, पत्रकार व उरण वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply