Breaking News

धनगर महासंघातर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

ऑल इंडिया धनगर महासंघाच्यावतीने रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, पनवेल तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आली.कर्जत तालुक्यातील दामखिंडी धनगर वाडा, खालापूर तालुक्यातील वाशिवली धनगरवाडा आणि पनवेल तालुक्यातील सारसई आपटा धनगर वाडा येथील इयत्ता पाहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी शैक्षणिक कला, क्रीडा आणि बारावी व पदवी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांना यथोचित सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, राज्य मिडिया अधिकारी महादेव कारंडे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी संपर्क प्रमुख तुकाराम कोकरे, रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र पुकळे, संपर्क प्रमुख आनंदराव कचरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष किशोर झोरे, खालापूर तालुका अध्यक्ष ठकुराम झोरे, पनवेल तालुका प्रमुख लक्ष्मण बावदाणे, पेन तालुका अध्यक्ष राजू आखाडे, पनवेल पेन तालुका संपर्क प्रमुख लक्ष्मण मरगले, पनवेल तालुका संपर्क प्रमुख मधुकर बावदाने, पनवेल तालुका महिला आघाडी अध्यक्षा अर्चना शिंदे, कामोठे शहर अध्यक्षा प्रणाली मॅडम, महाड तालुका महिला अध्यक्षा सुनीता ढेबे,रायगड जिल्हा मीडिया प्रमुख, पेन तालुका सचिव विजय उघडे, गणेश गोरे, नागेश गोरे, जगन गोरे, संतोष कोकरे, संतोष आखाडे, कर्जत तालुका संघटक विनायक कोकरे, केशव आखाडे, कल्पेश कोकरे, पनवेल तालुका सचिव  हरेश बावदाने, पांडुरंग गोरे, धोंडीराम आखाडे, बबन हिरवे आदींसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply