खोपोली : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला खोपोलीत कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कमलाबेन शहा सभागृहात मोठ्या पडद्यावर स्लाईड शोद्वारे पंतप्रधान मोदींचे विचार ऐकण्यासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा भटक्या विमुक्त जाती संयोजिका विद्या जामखेडकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, खोपोली संपर्कप्रमुख व प्रभारी सुनील घरत खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, सहचिटणीस प्रमोद पिंगळे, गोपाळ बावस्कर, माजी अध्यक्ष विजय तेंडुलकर डिलीप निंबाळकर, खोपोली चे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सोहनराज राठोड, माजी नगरसेविका अनिता शहा, सुनीती महर्शि, त्याचप्रमाणे विविध सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या समस्या पदाधिकार्यांनी जाणून त्यावर चर्चा केली. या वेळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे यांनी मार्गदर्शन केले. स्नेह भोजनानंतर कार्यक्रम समाप्त झाला.