Breaking News

पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात

जलसंपदेसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली नगरपालिका व खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत. याच नदीवरील पाण्यावर येथील औद्योगिक क्षेत्रही अवलंबून आहे. मात्र खालापूर तालुक्याची भाग्यरेषा असलेली ही पाताळगंगा नदी    प्रदूषणामुळे बेजार झाली आहे. हे प्रदूषण दिवसागणिक वाढत असल्याने या नदीतील जलसंपदा व नदीच्या पाण्यावर असलेल्या पाणी पुरवठा योजना धोक्यात येत असून नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे. पातळगंगा नदीला प्रदूषित करण्याचा सर्वात पहिला मान खोपोली नगरपालिकेकडे  जातो. शहरातील भुयारी गटार योजना रखडल्याने शहरातून निघणारे लाखो लिटर सांडपाणी विविध गटारे व नाल्यांच्या माध्यमातून थेट नदीत पात्रात सोडले जात आहे. त्याचप्रमाणे खोपोली शहरातील औद्योगिक पट्यात  काही मोठ्या व अनेक लहान कंपन्या कार्यान्वित आहेत, त्यांच्या कडूनही चोर मार्गाने प्रदूषित सांडपाणी पाताळगंगा नदीत सोडले जात आहे. घातक रासायनिक सांडपाणी अधिक प्रमाणात आल्याने  नदीतील मासे मरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. नदीच्या पाण्याला विचित्र दुर्गंधी यायला लागल्यानंतर स्थानिक नागरिक आक्रमक होतात व प्रदूषण नियंत्रण मंडळ, स्थानिक प्रशासन यांच्याकडे तक्रारी करतात. त्याची दखल घेत प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी पहाणी दौरा करून, पाण्याचे नमुने घेतात.तपासणीनंतर संबंधित कंपनी किंवा आस्थापना विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्वासन देऊन तात्पुरता विषय मिटवितात. हे चक्र कायमचे बनले आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच आहे.

नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खोपोली शहरातून निघणारे सांडपाणी तांत्रिक व शास्त्रीय प्रक्रिया करून उद्यान व झाडांसाठी  पुर्नरवापर करण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सांडपाणी एकत्र करणासाठी प्रस्तावित भुयारी गटार योजना अंमलात येण्यासाठी जलसंधारण व संबंधित खात्याकडून मंजुरी प्राप्त आहे. स्वच्छता अभियान अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यात   भुयारी गटार योजना कार्यान्वित करणे, नदी स्वच्छता मोहीम, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा निर्मिती आदी योजना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. येणार्‍या आर्थिक वर्षात ही कामे प्राथमिकतेने करण्यात येणार आहेत.

-सुमन औसरमल, नगराध्यक्षा, खोपोली

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply