पनवेल : रामप्रहर वृत्त
संजय भोपी सोशल क्लब, मॉर्निंग योगा ग्रुप आणि अलर्ट सिटीझन फोरम यांच्या वतीने 40 वर्षांवरील क्रिकेटवीरांसाठी खांदा कॉलनी प्रीमियर लीग (केसीपीएल) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) झाले. उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष तथा आयोजक संजय भोपी, नगरसेवक मनोहर म्हात्रे, भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, मोतीलाल कोळी, आर. जी. पाटील, निलेश गुप्ते, डॉ. आगलावे, अनंत पाटील, भीमराव पवार, सुनील श्रीखंडे, लक्ष्मण खशालखे, रामदास गोवारी, अभिषेक भोपी, आझाद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि खेळाडू उपस्थित होते. या वेळी रंगतदार सामने झाले. त्याचा खेळाडूंनी आनंद लुटला.