Breaking News

महाडचा वरंध घाट वाहतुकीस खुला

महाड : प्रतिनिधी

अतिवृष्टीत महाप्रळ -पंढरपूर मार्गावरील वरंध घाटात दरडी कोसळल्या होत्या तर अनेक ठिकाणी रस्ता खचून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जवळपास पाच महिन्यानंतर हा मार्ग  गुरुवार (दि. 16) पासून वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे.ऑगस्ट 6 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे माझेरी आणि वाघजाई दरम्यान दरडी कोसळल्या तर काही ठिकाणी रस्ता खचल्याने महाड वरंध मार्गे भोर-पुणे हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीस बंद ठेवला होता. ज्या ठिकाणी हा रस्ता खचला गेला होता, त्याठिकाणी सरंक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने साडेसात कोटी रुपये खर्च केले. या भिंतींचे काम पूर्ण झाले असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply