संजीवन म्हात्रे यांच्या विनोदी कार्यक्रमाला प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिरढोण गावात प्रथमच क्रांतिवीर महोत्सव सुरू करण्यात आला आहे. हा महोत्सव 15 ते 20 जानेवारीपर्यंत असणार आहे. या महोत्सवाचा तिसरा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी संजीवन म्हात्रे यांच्या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष शशी पाटील, साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल, शिरढोणचे माजी सरपंच धनाजी महाडिक, साधना वाजेकर, पांडुरंग मुकादम, कांचन मुकादम, बाळूशेठ पाटील, गणेश पाटील, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष प्रवीण खंडागळे, गायक राजा आदईकर उपस्थित होते.