खारघर : रामप्रहर वृत्त
वाहतूक विभाग, खारघर, नवी मुंबई, झा ग्रुप खारघर, संकल्प प्रतिष्ठान खारघर व पं. पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 15) सकाळी 10 ते 12च्या दरम्यान मुंबई सायन-पनवेल महामार्ग खारघर वाहतूक चौकी ब्रिजखाली आयोजित करण्यात आला होता. वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश याविषयी मार्गदर्शन केले. संकल्पचे सचिव अजय माळी यांनी संस्थेची मोफत हेल्मेट वाटपाविषयीची संकल्पना स्पष्ट केली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, झा ग्रुप चेअरमन नंदन झा, संकल्प प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मांजरेकर (मामा), पं. पारसनाथ शर्मा चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष संतोष शर्मा, संकल्पचे सचिव अजय माळी, समाजसेवक दीपक शिंदे, अनिल साबने, युवा कार्यकर्ता संदीप कासार, गुरू ठाकूर, दिलीप जाधव, रवींद्र बने, मोना अडवाणी, अॅड. संतोषी चव्हाण, ईश फाऊंडेशनच्या कीर्ती मेहरा, चांदणी अवघडे, हंसा पारघी, नितीन केदार, दिव्या मेहरा, सकाळ वृत्तपत्राचे गजानन चव्हाण, लोकमत दैनिकाचे वैभव गायकर, जनसभाचे संपादक आप्पासाहेब मगर, तरुण भारतचे संतोष वाव्हळ व इन्कलाबचे वसीमभाई उपस्थित होते.