Monday , January 30 2023
Breaking News

निवृत्त कर्मचार्यांचे खोपोली नगरपालिकेसमोर उपोषण

खोपोली : प्रतिनिधी

येथील नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी पी. के. देवदासन व अशोक गायकवाड यांनी निवृत्तीनंतरचा पगार व फायदे मिळावे यासाठी खोपोली नगरपालिका कार्यालयासमोर शुक्रवार (दि. 24)पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर 7 महिने झाले तरी सातव्या आयोगापोटी मिळणारी थकबाकी, रजेचा पगार, ग्रॅज्युइटीची थकबाकी, पेन्शन विक्रीची रक्कम अद्याप मिळाली नाही. तसेच त्याबाबत नगरपालिका कार्यालयाकडून ठोस उत्तर मिळत नाही, या पार्श्वभूमीवर देवदासन व गायकवाड यांनी शुक्रवारपासून   नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. दरम्यान, दुपारपर्यंत नगरपालिका प्रशासनाकडून कोणीही चर्चेस आले नाही. अथवा बोलाविले नाही. मात्र या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या निवृत्त कर्मचार्‍यांना प्रशासनाने बोलावून अनौपचारिक चर्चा केली. त्या चर्चेला आमची संमती नाही. आम्ही दिलेला प्रस्ताव मान्य असेल तरच उपोषण मागे घेऊ, असे उपोषणकर्ते देवदासन यांनी सांगितले. या संदर्भात खालापूरचे तहसीलदार चप्पलवार यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी मुख्याधिकार्‍यांकडून पूर्ण माहिती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी उर्वरित रक्कम देणे आहेच मात्र कालावधीबाबत मुख्याधिकार्‍यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. उपोषणकर्त्यानी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply