Breaking News

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले माणगाव

माणगाव ः प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला माणगाव तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानुसार रविवारी (दि. 5) एक दिवा स्वतःसाठी, देशाच्या हितासाठी अशी मनोधारणा करून एकता दाखवत लक्ष लक्ष दिव्यांनी संपूर्ण माणगावनगरीसह तालुका उजळून निघाला होता.

कोरोनाच्या महामारीतून जनतेची लवकर सुटका व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध युक्त्या लढवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन, थाळी  वाजवणे, टाळ्या वाजवणे अशी विविध आवाहने जनतेला केली. माणगावकरांनी या सर्वांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रविवारी पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या आवाहनालाही  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण माणगाव तालुका रविवारी रात्री लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply