पनवेल ः वार्ताहर
शहरातील लेबर कॅम्प विरुपाक्ष हॉलच्या बाजूला पनवेल येथे सुरू असलेल्या काँक्रीट रोडच्या कामाच्या ठिकाणावरून दोन लाख 90 हजार रुपयांचे 14 लोखंडी चॅनेल चोरल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहिती प्राप्त करून आरोपी हरुण लाला सय्यद (24), इब्राहिम साहेब शेख (30, दोन्ही रा. नवनाथनगर झोपडपट्टी, पनवेल) यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी चोरी केलेले लोखंडी चॅनेल आरोपी दिलशेर शाहा मोहम्मद खान (35, रा. उसर्ली खुर्द पनवेल) यास दिल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपी दिलशेर शाहा मोहम्मद खान याला विचुंबे, पनवेल येथून ताब्यात घेऊन तपास करता त्याने लोखंडी चॅनेल विकत घेतल्याची कबुली दिली आहे.