Breaking News

केळवली-बीडखुर्द मार्गाची चाळण

प्रवास करणे बनले कठीण; खड्ड्यांतून मार्गक्रमण जिकिरीचे

खोपोली : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील काही रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे प्रवासीवर्गाला व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच खालापुरातील केळवली रेल्वे स्टेशन ते बीडखुर्द हा मार्ग जणू खड्ड्यांचा मार्ग म्हणून ओळखला जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसह प्रवासीवर्गाला जिकिरीचे बनल्याने या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक व प्रवासीवर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने यांचे गांभीर्य लक्षात घेत या ठिकाणी विशिष्ट निधी उपलब्ध करून देत हा मार्ग लवकरात लवकर खड्डेमुक्त करावा, जेणेकरून सर्वांचा प्रवास सुखकर बनेल, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या मार्गाच्या दुरवस्थेची संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासन दखल घेणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. खालापूर  तालुक्यातील काही रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट बनल्याने प्रवासीवर्गाला व वाहनचालकांना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे समजत नाही. यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाणही वाढू लागले आहे. परिणामी प्रवासी आणि वाहनचालकांतून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वर्षांपासून केळवली स्टेशन मार्गे बीडखुर्द मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.

बीडखुर्द-वणी-केळवली व अन्य गावे ही लहानमोठ्या लोकवस्तीची आहेत. गावात दररोज गावकरी व अन्य नागरिकांची ये-जा असते. गावाला जोडणार्‍या मुख्य रस्त्याची खड्डेमय अवस्था झाल्याने येथून प्रवास करणे कठीण बनत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेत हा मार्ग खड्डेमुक्त बनवावा.

-रामदास फावडे, सामाजिक कार्यकर्ते, बीडखुर्द

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply