Breaking News

समर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष खालापुर तालुक्याची समर्थ बूथ अभियान अंतर्गत मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांची बैठक झाली.

या वेळी महाराष्ट्र राज्यातील व रायगड जिल्ह्यातील दरड संकटामध्ये बळी पडलेल्या बांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानतंर सभा सुरू झाली. या वेळी खालापूर तालुका अध्यक्ष रामदास ठोबंरे यांनी प्रस्तावना केली तसेच मावळ लोक सभा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी अभियानाची माहिती दिली. या अभियानामुळे पक्षाला होणारा फायदा तसेच येणार्‍या निवडणुकीत पक्षाचे संघटन कशाप्रकारे अधिक मजबूत होईल यासंदर्भात मार्गदर्शन केले.

हे अभियान 6 जुलै ते 17 सप्टेंबरपर्यंत राज्यात सुरू राहणार आहे. खालापुर तालुक्यातील 66 बुथचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. बूथ तसेच पन्ना प्रमुख यांनी कोणते काम पक्षासाठी करायचे आणि पक्षाचे विचार व प्रसार शेवटच्या घटकापर्यंत नेण्यासंदर्भात उत्तम मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उरण विधानसभेचे प्रमुख श्रीवर्धन पटवर्धन, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply