Breaking News

भरत गुरव पुरस्काराने सन्मानित

नागोठणे ः प्रतिनिधी
राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात झालेल्या समारंभात गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार भरत प्रल्हाद गुरव यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 10 हजार रुपये देऊन गुरव यांना सन्मानित करण्यात आले.
या समांभास जि. प. अध्यक्ष योगिता पारधी,  जिल्हाधिकारी निधी चौधरी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे आदी उपस्थित होते.
कोलाड येथील एमडीएन फ्युचर स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असलेले नागोठण्याचे भरत गुरव यांना याआधी राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गुणवंत खेळाडू, तर रायगड जिल्हा परिषदेकडून रायगडभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply