Breaking News

कोकण विभागीय मेळाव्याला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियन यांच्यावतीने आयोजित कोकण विभागातील पनवेल महानगरपालिकेसह नगरपालिका, आणि नगरपंचायतीमधील कामगार कर्मचारी आणि अधिकार्‍यांचा कोकण विभागीय मेळावा

रविवारी (दि. 19) काळण समाज हॉलमध्ये झाला. या मेळाव्यास रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

हा मेळावा म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड.सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या मेळाव्यास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले, महिला व बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी

आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply