उरण : वार्ताहर
रोहा नायब तहसिलदार संजय नागावकर यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सुचनेनुसार व महसूल दिनानिमित उरण तहसिलदार भाऊ साहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगरपरिषद सभागृहात शनिवारी (दि. 1) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तहसीलदार, नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, कार्यालीन कर्मचारी, कर्मचारी, यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच शिबिरात उरण तहसीलदार भाऊ साहेब अंधारे, नायब तहसीलदार नरेश पेढवी, सदगुरु चॅरीटेबल ब्लड बँक कोपरखैरणे (नवी मुंबई), डॉ. राम वर्मा, डॉ. हरमीतसिंग कोहली, चेतन भाचकर, सर्कल अधिकारी, कर्मचारी, तलाठी आदी उपस्थित होते.