उरण : बातमीदार, वार्ताहर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने रविवारी (दि. 12) राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन उलवे नोडमध्ये करण्यात आले होते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या शिबिरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव करण्यात आला.
याआधी महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळाला स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडकोने करून तो राज्य सरकारकडे पाठविला होता, मात्र काँग्रेसने आता वेगळी भूमिका घेतलीय.
नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते ‘दिबां’चेच नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतला असून वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत. त्यास भूमिपुत्रांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच स्थानिकांच्या भावना लक्षात घेत काँग्रेसने शिवसेनेविरोधात जात सूर बदलल्याचे बोलले जात आहे.
Check Also
गणेशोत्सवानिमित्त सोमवारी शिवाजीनगर येथे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचे आयोजन
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेश उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 9) शिवाजीनगर येथे माजी खासदार लोकनेते रामशेठ …