पनवेल : रामप्रहर वृत्त
क्रांतिवीर प्रतिष्ठाण शिरढोण व आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सामाजिक विकास संस्था शिरढोण
यांच्यावतीने क्रांतिवीर महोत्सवाचे शिरढोण येथे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 15 ते 20 जानेवारी पर्यंत असणार आहे. या महोत्सवाचा चौथा दिवस मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 18) साजरा झाला. या वेळी मिस रायगड स्पर्धचे
आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवास एकच वादा राजु दादा फेम गायक परमेश माळी, सिनेअभिनेत्री जुई भेंडखळे, भाजपचे रायगड जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र पाटील, क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नामदेव शेठ फडके, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका प्रमिला पाटील, माजी सरपंच, पद्माकर वाकडिकार, मनोदय इंग्लिश स्कूल संस्थापक भगवान वाजेकर, सोनारीचे सरपंच महेश कडू, कसळखंडच्या सरपंच माधुरी पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, सुनिल माळी, शिल्पा म्हात्रे, माजी सरपंच पांडुरंग मुकादम, डी. के. भोपी, रिटघरचे सरपंच भारत भोपी, सांगूर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य शाम ठोंबरे, जांभिवलीच्या सरपंच रिया कोंडीलकर, हरिग्रामच्या सरपंच शशिकला पाटील, अॅडव्होकेट शुभांगी भोपी, राधे एंटरप्राइजेसचे दिपक पाटील, संतोष पाटील, समीर मढवी, सतिष घरत, महोत्सवाचे आयोजक मंगेश वाकडीकर, प्रितेश मुकादम, विजय भोपी, निलेश भोपी, सुशांत वेदक आदी उपस्थित होते.