पनवेल : ज्येेष्ठ नागरिक संघाचा 18वा वर्धापन दिन रविवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी उद्योगपती जे. एम. म्हात्रे, ज्येेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी,जयवंत गुर्जर, दिगंबर चापळे, शामल आंग्रे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य आदी उपस्थित होते.