Breaking News

सिद्धगडचा आझाद दस्ता रूपेरी पडद्यावर

शहीद भाई कोतवाल चित्रपट शुक्रवारी होणार प्रदर्शित

कर्जत : संतोष पेरणे
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील उपेक्षित व दुर्लक्षित राहिलेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील या आझाद दस्त्यातील क्रांतिवीरांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शहीद भाई कोतवाल असे या चित्रपटाचे नाव असून, त्याचा प्रेरणादायी ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच गाजत असल्याने या सिनेमाविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
’एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग’ हे घोषवाक्य उरात बाळगून भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. स्वातंत्र्याची ही ऐतिहासिक व रक्तरंजित शौर्यकथा प्रथमच चित्रपटाद्वारे प्रदर्शित होत आहे. स्वरजाई आर्ट मीडिया प्रोडक्शनचे प्रवीण दत्तात्रय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती, तर एकनाथ देसले व पराग सावंत यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात हुतात्मा भाई कोतवाल यांची भूमिका आशुतोष पत्की यांनी आणि हुतात्मा हिराजी पाटील यांची व्यक्तिरेखा परेश हिंदुराव यांनी साकारली आहे. चित्रपटात अशोक पत्की, रूपेश गोंधळी, भरत बडेकर यांनी संगीत दिलेल्या गाण्यांना सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे अशा दिग्गजांचा आवाज लाभला आहे.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply