पनवेल ः प्रतिनिधी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील रेस्टॉरंट्स, कॅफे, कॅन्टीन, डायनिंग हॉल, बारवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार व शासकीय सुटीच्या दिवशी येथे सायंकाळी 7 वाजल्यानंतर केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. याबाबतचे निर्देश मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 26) दिले आहेत.
महापालिका हद्दीत खासगी आस्थापना व मॉल्ससह सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहतील. तसेच अन्य दिवशी या सेवा 50 टक्के क्षमतेसह रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवा प्रदान करणार्या आस्थापना तसेच दुकानांना या प्रतिबंधातून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिकेकडून घालण्यात आलेल्या या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही मनपा प्रशासनाने दिला आहे.
Check Also
परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …
RamPrahar – The Panvel Daily Paper