पेण : प्रतिनिधी
हायस्पीड नेटवर्कच्या वतीने पेणमध्ये ऑफिस टू गिगा फायबर नेटवर्क सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नगरसेवक निवृत्ती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवृत्ती पाटील यांनी या वेळी केले.
या नेटवर्कचा स्पीड 14 ते 100 एमबीपीएस असून, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही ही सेवा सुरू राहणार आहे. ऑफिस टू होम नेटवर्क सेवा एकाच वेळी एकाच दरात देण्यात येणार आहे. सुरुवातीला शहरात सुरू करण्यात आलेली ही सेवा नंतर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू होणार आहे. या सेवेच्या शुभारंभावेळी अमित टेमघरे, पत्रकार विजय मोकल, विनायक पाटील, विवेक जोशी, निशा म्हात्रे, मोसीन मोगल, निलेश म्हात्रे, यश गोरी, मंगेश म्हात्रे, राज साळवी, यशवंत कवरे आदी उपस्थित होते.