पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन शुक्रवारी (दि. 23) करण्यात आले होते. नवीन पनवेल येथील के.आ. बांठिया शाळेत आयोजित या उपक्रमास पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नवीन पनवेल येथील के.आ. बांठिया शाळेत आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, सदस्य भूपेंद्र पाटील, बाबूराव पालकड, गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, बबन म्हात्रे, सुरेश जोशी, मेघा पवार आदी उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper