Breaking News

बिर्ला कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप

चौक : रामप्रहर वृत्त          

पाताळगंगा औद्योगीक वसाहतीमधील बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या वतीने चौक (ता. खालपूर) येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर आणि सारंग येथील विद्या मंदिर या शाळांमधील विद्यार्थ्यांना नुकताच सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

चौक येथील विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  बिर्ला कंपनीतील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा, बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड जे. जेना, मानव संसाधन विभाग प्रमुख प्रकाश देसाई, समाज विकास अधिकारी लक्ष्मणजी मोरे, चौक शाळेचे मुख्याध्यापक भोमले, सारंग शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक पाटील   यांच्यासह कंपनीतील महिला कर्मचारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी शोभाताई देशमुख व योगेंद्रभाई शहा यांनी मार्गदर्शन केले.

विद्या प्रसारिणी सभा संस्थेच्या वतीने कंपनीच्या पदाधिकार्‍यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply