Breaking News

जेएनपीटीची गोलमेज चर्चा

जालना ड्राय पोर्टची रणनीती आखण्यासाठी यशस्वी बैठक

उरण : वार्ताहर

जालना ड्राय पोर्टच्या विकास आराखड्याची रणनीती निश्चित करण्याच्या उद्देशाने जेएनपीटीचे अध्यक्ष आयएएस संजय सेठी यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली.

जेएनपीटीद्वारे प्रस्तावित ड्राय पोर्ट (सुके बंदर) आणि औद्योगिक पार्क (ज्याला मल्टीमोडल लॉजिस्टीक्स पार्कही संबोधले जाते)च्या विकासाची योजना असून हे पार्क महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळील जालना येथे असणार आहे. याठिकाणी आयातदार/ निर्यातदारांकरिता बंदराला जोडणार्‍या रेल्वेची थेट विस्तारित जोड मिळाल्याने मराठवाडा प्रदेशात अतिशय सुलभतेने उद्योगाला लॉजिस्टीक सुविधा पुरवता येणार आहेत.

एर्नस्ट अ‍ॅण्ड यंग एलएलपी; चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए); कायहाऑन पेपर मिल्स लिमिटेड; गौरी अ‍ॅग्रोटेक प्रोडक्ट्स प्रा. लिमिटेड; शक्ती इंजिनिअरिंग कंपनी; सवेरा ग्रुप (इंजिनीअरिंग डिव्हीजन); ठाकूरजी सॉल्वेक्स प्रा. लिमिटेड; तनिश ग्लोबल फॉरेन ट्रेड्स अ‍ॅण्ड फॅसिलिटेशन्स; आणि एस. बी. एक्सपोर्टर्स, सालासार शिपिंग, एमआरपी अ‍ॅण्ड असोसिएट् यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

जेएनपीटीमध्ये एकट्या महाराष्ट्र राज्यामधून बंदर भागात जवळपास 2 दशलक्ष टीईयुची रहदारी हाताळली जाते. ही वाहतूक जेएनपीटी कंटेनर रहदारीच्या साधारण 50% आहे. त्यामुळे मालाचा क्लिअरन्स आणि एकत्रीकरण झटपट व्हावे, अंतर्देशीय संपर्कासाठी जेएनपीटीला साह्य म्हणून हब-अँड-स्पोक मॉडेल निर्मितीच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यात सुक्या बंदरांचा विकास करण्याची योजना आहे. ही सुकी बंदरे इनलँड कंटेनर डेपो आणि डेव्हलपरमार्फत कार्यरत राहतील, जे कार्गो चलनवलनाला

सुविधा उपलब्ध करून देतील.

सुक्या बंदरांचा होणार विकास

चर्चेत सहभागीदारांना मध्यवर्ती प्रकारच्या पार्किंग प्लाझाची कल्पना थोडक्यात समजविण्यात आली. हा 277 हेक्टरवर वसवण्यात येणारा पहिला मल्टी-प्रोडक्ट सेझ असून सुरक्षेची अतिरिक्त खबरदारी घेण्यासाठी 3 मोबाईल स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील जालना, वर्धा, नाशिक आणि सांगली येथील धोरणात्मक दृष्टीने तयार करण्यात आलेल्या ठिकाणावरील सुक्या बंदरांचा विकास होणार आहे. तसेच जालना ड्राय पोर्ट ते जेएनपीटी दरम्यान रेल्वे सेवा फेर्‍या वाढविण्याची गरज; इतर कार्यरत आयसीडींमध्ये रिकाम्या कंटेनरची उपलब्धतता व मनमाड ते औरंगाबाद दरम्यान रेल्वे ट्रॅकचा दुहेरी विस्तार अधोरेखित करण्यात आले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply