मुंबई ः सरपंचांची निवड थेट जनतेतून करायची की नाही, या मुद्द्यावरून राज्यातील ग्रामपंचायती व राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारने सरपंचांची निवड थेट जनतेतून न करता सदस्यांमधून करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे चिडलेल्या हजारो ग्रामपंचायतींनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. सरपंचाची निवड ही जनतेतूनच व्हावी, अशा प्रकारचा ठराव घेत राज्यातील 9000 ग्रामपंचायतींनी थेट ठाकरे सरकारलाच आव्हान दिले. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या अध्यक्षांनी याबद्दलची माहिती दिली, पण राज्याच्या ग्रामविकासमंत्र्यांनी मात्र याबाबत कानावर हात ठेवले. ग्रामपंचायतींनी राज्य सरकारविरोधात लंगोट बांधल्याने राजकीय आखाड्यात खुर्चीचा अभूतपूर्व सामना रंगू लागला आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper