Tuesday , February 7 2023

मोहोपाड्यातील आनंदा दळवी यांना पुरस्कार

मोहोपाडा : प्रतिनिधी

वासांबे-मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्मचारी आनंदा लक्ष्मण दळवी यांना अमरदीप बालविकास फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय एकात्मता आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

आनंदा दळवी यांना हा पुरस्कार आर्मी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमात विंग कमांडर राजेंद्र महानुभव (सेवानिवृत्त भारतीय एअर फोर्स), सिने अभिनेते अरुणकुमार व गायक एकनाथजी खोल्लम, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समाजसेवक आनंदा दळवी यांनी आतापर्यंत निराधार महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी निरपेक्षपणे केलेले कार्य, राजिप शाळेतील विद्यार्थ्यांना करीत असलेली स्व:खर्चाने निस्वार्थी मदत, वैद्यकीय व अपघात क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करीत असल्यामुळे समाजसेवक आनंदा दळवी यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल राष्ट्रीय एकात्मता आयकॉन पुरस्कार देण्यात आला. या वेळी विंग कमांडर राजेंद्र महानुभव, एकनाथजी खोल्लम, अरुण कुमार, शाम जाधव, प्राचार्य विजय आर्मी स्कूल व प्रमुख उपस्थिती सिने अभिनेत्री सिद्धी पाटणे, सिने व टिव्ही कलाकार शुभांगिनी पाटील, फातीमा मुजावर, नजमुल हुसेन मुजावर, डॉ. जे. बशीर, अमरदीप फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एन. डी. खान, सचिव सलमा खान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता माळी यांनी केले.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply