Breaking News

इंटरस्कूल-क्लब क्रिकेट स्पर्धेत एस.ए. अ‍ॅकॅडमी मुंबई संघ विजेता

खारघर : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पक्ष खारघर शहर मंडळ पुरस्कृत जयहिंन्द क्रिडा मंडळ खारघरच्या वतीने 14 वर्षाखालील इंटरस्कूल-क्लब सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 24 ते 26 जानेवारी 2020 या कालावधीत रामशेठ ठाकूर पब्लीक स्कूल खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

स्पर्धेत मुंबई, ठाणे, वाशी, नेरूळ, बेलापूर, कामोठे, उरण येथील शाळंनी आणि क्लब ने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना एस.ए अकॅडमी मुंबई विरूद्व नेरूळ जिमखाना यांच्यात झाला. त्यात एस.ए अकॅडमी मुंबई संघाने नेरूळ जिमखाना संघाला पराभुत करून विजेते पद पटकाविले. अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुस्रकार आदिल सय्यद ठरला.

तसेच संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज-आदिल सय्यद आणि उत्कृष्ट फलंदाज-देवांग घाग आणि मालिकावीराचा पुरस्कार ़़ऋषीकेश चव्हानने पटकाविला, उत्कृष्ट गोलंदाजास-बॉल्स, उत्कूष्ट फलंदाज-ग्लोब्ज आणि मालिकावीरास बॅटवरील सर्व पुरस्कार व्ही 3 स्पोर्टस ठाणे यांच्या वतीने देण्यात आले.

विजेत्या संघाला माजी क्रिकेट पटू-श्री नितीन सुर्वे यांच्या हस्ते विजेता चषक आणि प्रशिस्त पत्र तसेच उपविजेत्या संघास उपविजेता चषक आणि प्रशिस्त पत्र भाजप खारघर शहर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.

या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर, एमसीएचे सयुंक्त सचिव शाह आलम सर, विकास साटम, माजी क्रिकेट पटू जलाल शेख सर, रामशेठ ठाकूर पब्लीक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, एमसीए तसेच मंडळाचे मुख्य प्रशिक्षक योगेश खडगी, उपाध्यक्ष संजय खाबेरागाडे, दिपक शिंदे, दिलिप जाधव, बिना गोगरी, गीता चौधरी, मधुमिता जेना, संतोष शर्मा, प्रविण पाटील, निलेश बाविस्कर, रामजी बेरा, समीर कदम, इत्यादींची विशेष उपस्थिती होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यात मंडळाचे संस्थापक/अध्यक्ष कृष्णा खडगी, सचिव मकरंद पाटील तसेच खेळाडू अमर चव्हाण, रूपेश खडगी, आयुष कातेे, अक्षय जोशी, आदित्य हरकरे, निनाद आदींचे सहकार्य लाभले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply