नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
खगोल मंडळातर्फे नवी मुंबई महानगरपालिका संचालित राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय, रबाले येथे आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी (दि. 27) जानेवारी 2020 रोजी झालेल्या या कार्यक्रमात 320 विद्यार्थी आणि 30 शिक्षकांनी घेतला. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थी हे कष्टकरी समाजातील होते, हे नमूद करण्यासारखे आहे. त्यावेळी खगोल मंडळाच्या मिलिंद काळे यांनी विद्यार्थ्यांना खगोलविषयक माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुर्बिणीद्वारे आकाशदर्शन घडविण्यात आले. या वेळी नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकर सोनवणे, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक मारुती गवळी, मुख्याध्यापिका अलका ढवळे, कमलेश इंगळे यांच्यासह इतर शिक्षक तर समीर कदम, अमोल भाईंदरकर, अभिषेक सामंत व महेंद्र मोरे हे खगोल मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. खगोल मंडळातर्फे हा कार्यक्रम विनामूल्य करण्यात आला.