Breaking News

इथिओपिया दृर्घटनेतील मृतांत भारतीय महिला अधिकारी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

इथिओपिअन एअर लाइन्सच्या विमान अपघातात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या चारवरून सहा इतकी झाली आहे. हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. दरम्यान, या मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.

इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणार्‍या इथिओपिअन एअर लाइन्सच्या विमानाने उड्डाण घेताच सहा मिनिटांच्या आत अपघाग्रस्त झाले होते. यामध्ये सर्व 157 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका भारतीय कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. या विमान दुर्घटनेतील मृतांची नावेही स्वराज यांनी प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये वैद्य पन्नागर भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश, नुकारवारपू मनीषा आणि शिखा गर्ग यांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश इथिओपियातील भारतीय उच्चायुक्तांना देण्यात आले आहेत. स्वराज यांनी मृतांच्या कुटुंबीयांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, मी वैद्य यांच्या टोरंटोतील मुलाशी फोनवरून चर्चा केली, मात्र त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील सहा व्यक्तींना गमावल्याचे कळताच आपल्याला खूपच दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे, तसेच इथिओपिया आणि केनियातील भारतीय दूतावासाशी संवाद साधत त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply