Breaking News

अल्पवयीन मुलगी तब्बल 400 जणांकडून बनली वासनेची शिकार

बीड ः प्रतिनिधी

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत एका 16 वर्षांच्या मुलीवर तब्बल 400 लोकांनी बलात्कार केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. विशेष म्हणजे यात एका पोलिसाचाही समावेश असून पीडिता आता दोन महिन्यांची गर्भवती आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी आठ महिन्यांपूर्वी तिचे लग्न लावून दिले, मात्र, पती आणि सासरच्या मंडळींनी तिला मारहाण आणि वाईट वागणूक दिली आणि छळ केला. त्यामुळे ती पळून गेली आणि वडिलांकडे राहायला आली, मात्र वडिलांनी तिला परत न घेतल्याने ती बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील बसस्थानकावर भीक मागायला गेली. यातूनच तिला लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले.

बालकल्याण समितीला दिलेल्या निवेदनात ती म्हणाली, माझ्यावर अनेकांनी अत्याचार केले आहेत.

अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी अनेक वेळा गेले, पण पोलिसांनी दोषींवर कोणतीही कारवाई केली नाही. त्याऐवजी एका पोलिसाने माझ्यावर अत्याचार केला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply