Tuesday , February 7 2023

‘महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही’

मुंबई ः प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर मते मिळाली, मात्र त्यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत घरोबा केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार जास्त काळ टिकणार नाही. ते जास्तीत जास्त सहा ते आठ महिने टिकेल, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते फरहान आझमी यांनी केला आहे. संपूर्ण शिवसेनेमध्ये फक्त उद्धव ठाकरे हेच लायक आहेत, असा उपरोधिक टोलाही त्यांनी हाणला आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांच्या या घोषणेनंतर भाजपने टीका केली होती. आता काँग्रेस, राष्ट्रवादीचे मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे पुत्र फरहान आझमी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. जर उद्धव ठाकरे अयोध्यामध्ये जाऊन राम मंदिर बांधणार असतील, तर आम्हीसुद्धा अयोध्याला जाणार, पण तिथे आम्ही बाबरी मशीद बांधणार, असे आझमी म्हणाले. फरहान यांच्या या विधानांनंतर एकच खळबळ उडाली आहे.

Check Also

फॉर्म हरवलेला पक्ष

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस …

Leave a Reply