Breaking News

ग्रामीण भागात नंदीबैलाचे आगमन

कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी साकडे

मोहोपाडा : प्रतिनिधी

ग्रामीण भागात भात कापणी झाल्यापासून पाऊस पडेपर्यंत घाटमाथ्यावरील विविध नागरिक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोकणात दाखल होत असतात. आज ही ग्रामीण भागात विविध ठिकाणी पोतराज, गोंधळी, नंदीबैल वाले येत आहे. कोरोना महामारी लवकर संपू दे असे साकडे ग्रामीण भागातील महिला नंदीबैलाकडे घालत आहेत.

कोरोनासारखी महामारी निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातून कोकणात येणारे नागरिकांचे प्रमाण तुरळक आहे. परंतु पिढ्यांपिढ्यापासून करीत असलेला व्यवसाय खंडीत होवू नये, संकट कोणतेही असो पोटाची खळगी भरण्यासाठी घराबाहेर पडावे लागते. हे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात नंदीबैल ते येत असतात. आज आपल्या देशावर फार मोठे संकट आले आहे. मध्यंतरी हे संकट हळूहळू कमी होत असतांना पुन्हा वाढत असल्यामुळे अनेकांना भितीने ग्रासले आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट लवकरच हद्दपार होण्यासाठी नंदीबैलाला प्रश्न विचारीत आहेत. मिळालेले सकारात्मक उत्तर पाहून ग्रामीण भागातील महिला वर्गाच्या चेहर्‍यावर समाधानाचे स्मित हास्त दिसत आहे.

कोरोनामुळे अनेकांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. हाताच्या तळव्यावर पोट भरणार्‍यांची संख्या अधिक असून कोरोनांचे नियम पाळून व्यवसाय करीत आहे. पायात घुंगरु खांद्यावर शाळ विविध वेशभूषेत सजविण्यात आलेल्या नंदीबैलाला आपल्या जवळ असलेले धान्य, कपडे, पैसे देवून त्यांचा आशीर्वाद ह्या महिला घेत आहेत.

Check Also

गुरूकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ‌सीकेटी‌ विद्यालयाचे यश

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल ः रामप्रहर वृत्तकोल्हापूर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुरूकुल …

Leave a Reply