ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हालचालींना वेग
अलिबाग : प्रतिनिधी
राज्यात ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून, त्यासाठी शुक्रवार
(दि. 11)पासून आचारसंहिता लागू झाली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय तसेच प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
रायगडात पनवेल तालुक्यातील 24, रोहा 21, कर्जत नऊ, पेण सात, उरण सहा, माणगाव व महाड प्रत्येकी पाच, अलिबाग व श्रीवर्धन प्रत्येकी चार आणि म्हसळा तीन अशा 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे. यासाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 18 जानेवारीला मतमोजणी होईल.
तालुकानिहाय ग्रामपंचायती
पनवेल-बारवई, साई, सावळे, खानाव, वलप, आकुर्ली, हरिग्राम, खैरवाडी, नानोशी, पोसरी, खानावळे, उमरोली, आपटा, पाली देवद, कोळखे, सांगुर्ली, मोर्बे, उसर्ली खुर्द, पाले बुद्रूक, देवळोली, केवाळे, वाकडी, वाजेे, वारदोली; रोहा-निडी तर्फे अष्टमी, रोठ बुद्रुक, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, धामणसई, मालसई, महाळूंगे, शेडसई, तिसे, वरसे, वरवटणे, खांब, पळस, कोंडगाव, ऐनघर, चिंचवली तर्फे दिवाळी, वाशी, वावे पोटगे, गोवे; कर्जत-कोल्हारे, जिते, पोशीर, साळोख तर्फे वरेडी, हुमगाव, कडाव, वैजनाथ, भिवपुरी, दामत; पेण-काळेश्री, बोर्झे, वाकरुळ, खारपाले, कामार्ली, आंबेघर, जोहे; उरण-चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली, फुंडे, वेश्वी; माणगाव-बामणोली, देवळी, लोणेरे, लाखपाले, टेमपाले;
महाड-नरवण, भेलोशी, मांडले, आसनपोई, बिरवाडी; अलिबाग-मान तर्फे झिराड, सासवणे, पेझारी, वाघोडे; श्रीवर्धन-कोलमांडले, कारिवणे, गालसुरे, दिघी; म्हसळा-पाभरे, केल्टे, लिपणी वावे.