Breaking News

पेणमध्ये आदिवासींच्या जमिनीतून मातीचोरी

गरिबांना आमिष दाखवून होतेय फसवणूक

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील हमरापूर फाट्यावरील शितोळे आदिवासीवाडी आहे. तेथील काही आदिवासींना वनहक्क कायद्यानुसार आरक्षित जमिनी मिळाल्या आहेत. या जमिनीतून मातीमाफीया आदिवासींनी धमकावून मातीची चोरी करत आहेत. आदिवासींंच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणार्‍यांविरूद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. पेण तालुक्यात सध्या मातीचोरीला उधाण आले आहे. अनेक ठिकाणी आदिवासींच्या शेतजमिनीतून मातीची चोरी होताना पाहावयास मिळत आहे. महामार्गाच्या कामासाठी माती आवश्यक असल्याचे सांगून महसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करीत मातीमाफिया मातीची वाहतूक करीत आहेत. शितोळेवाडी येथील सर्वे नंबर 15 व 22 हे वनखात्याच्या ताब्यात आहेत व त्यातील काही भाग आदिवासी बांधवांना वनहक्क कायद्यानुसार दिले गेले आहेत. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काहीजण जागा भाडेतत्वावर घेतात आणि त्या जागेतील माती विकतात. आदिवासींना उदरनिर्वाहासाठी शासनाने जमिनी दिल्या आहेत. वास्तविक वनहक्काने मिळालेल्या जमिनी भाडेतत्वावर देता येत नाहीत. तसेच आदिवासींच्या जमिनींची विक्रीही करता येत नाही. मात्र, मातीमाफिया पैशांचे आमिष दाखवून आदिवासी बांधवांना फसवत आहेत. या जागेतून सिडकोची जलवाहिनी जाणार आहे. या कामाची सुरूवात होत असून, त्यासाठी खोदलेल्या खड्डयातून निघालेले दगड व मातीसुद्धा चोरून नेण्यात येत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply