ग्रामपंचायत उमेदवार समर्थकांसह भाजपमध्ये दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त
शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाला भाजपने जोरदार झटका दिला आहे. शेकापचे प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार भाऊदास सिनारे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 13) भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा भाजपच्या पनवेल येथील मध्यावर्ती कार्यालयात तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत झाला. या कार्यक्रमास भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तुकाराम पाटील, माजी सरपंच बाळाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकवा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.