Breaking News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमाला सक्तमजुरी

अलिबाग : प्रतिनिधी – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला एका वर्षातच विशेष न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी अजय कमलाकर वाघमारे (वय 22, रा. रोडे काश्मिरे फणसवाडी ता. पेण) याचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आहे. त्याचे पीडित मुलीबरोबर (वय 16) एप्रिल 2019मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मे महिन्यात रात्री 10च्या सुमारास आरोपी पीडित मुलीला फिरावयास घेऊन जाताना पीडितेच्या वडिलांनी पाहिले व त्यांनी आरोपीला हटकले. तेव्हा आरोपीने पीडितेच्या वडिलांना मी तिच्यावर प्रेम करतो व तिच्याशी लग्न करणार आहे, असे उर्मटपणे सांगितले. त्यानंतर 21 मे 2019 रोजी आरोपीने पीडितेला पेण येथे बोलावून चवणे आदिवासी वाडीवर नेऊन तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. यावरून पीडितेच्या आईने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

या प्रकरणी आरोपी अजय वाघमारेला 6 जून 2019  रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांचे न्यायालयात झाली. या वेळी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी सात साक्षीदार तपासले. यात गुन्ह्यातील पीडित मुलगी, तिची आई व काका यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली तसेच पैरवी अधिकारी श्रीमती सायगावकर व पोलीस हवालदार सचिन खैरनार आणि मांडवा पोलीस ठाण्याचे नाईक श्री. ठाकूर यांचे सहकार्य मोलाचे ठरले. न्यायालयाने आरोपीला भा.दं.वि. कलम 376 व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण या कलमाखाली 10 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply