Breaking News

खारघर येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात

नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

खारघर प्रभाग 5 येथील रस्त्याच्या दुरुस्ती विषयी प्रभाग समिती माजी सभापती व नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी सिडकोकडे सतत पत्रव्यवहार केला. त्यांच्या ह्या पाठपुराव्याला यश येऊन सेक्टर 4 व सेक्टर 3 येरळा हॉस्पिटल समोर रस्त्याच्या कामाला गुरुवारी (दि. 5) सुरुवात झाली. या वेळी शत्रुघ्न काकडे, खारघर शहर उपाध्यक्ष संजय घरत, राजेंद्र मांजरेकर, अजय माळी, अक्षय पाटील, शुभम म्हात्रे आणि सेक्टर 4 व सेक्टर 3 मधील रहिवासी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …

Leave a Reply