Breaking News

पोलादपूर-खेडदरम्यान महाकाय भुयारी मार्ग

पोलादपूर ः प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून पोलादपूरमधील भोगाव ते खेड तालुक्यातील खवटीपर्यंत भुयारी मार्ग खोदण्याचे काम सुरू केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा सर्वांत मोठ्या लांबीचा भुयारी मार्ग असणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी मार्ग म्हणून पोलादपूरमधील भोगाव येथे भुयारी मार्गासाठी यंत्रसामुग्रीची जमवाजमव सुरू असून प्रत्यक्षात रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील खवटी येथून पावसाळ्यापूर्वीच भुयारी मार्गाचे काम सुरू झाले. राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या भुयारी मार्गाचे अवलोकन केले होते. पोलादपूर-खेडदरम्यान असलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांतून असणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या डोंगरातून खेड बाजूने हे काम सुरू झाल्यानंतर आजमितीस साधारणपणे 200 मीटर अंतराचा भुयारी मार्ग झाला. सह्याद्रीचा कातळ फोडून प्रत्येकी तीन पदरी दोन मार्गिका उभारण्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण होईल तेव्हा 1.84 किलोमीटर भुयारी मार्ग कशेडी घाटाला पर्याय म्हणून पूर्ण झाला असेल. 2019 साली नोव्हेंबरमध्ये सुरू झालेले हे काम एप्रिल 2021पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक नवले यांनी व्यक्त केली. यासाठी 200 कोटींचा तसेच भुयारी मार्गाच्या दुतर्फा ऍप्रोच रस्ते करण्याची गरज असून यासाठी 441 कोटी या भुयारी मार्गाचा एकूण खर्च अपेक्षित आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply