पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला एज्युकेशन टुडेज महाराष्ट्र स्कूल रँकिंग्ज 2025 मार्फत होलिस्टिक एज्युकेशन श्रेणीमध्ये महाराष्ट्राचा सर्वोत्तम सीबीएसई स्कूल पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. पुरस्कार 12 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईत झालेल्या महाराष्ट्र एज्युकेटर्स समिट अँड अवॉर्ड्स 2025 मध्ये कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार स्कूलला मिळाल्याबाबत लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठेचे प्रिन्सिपल अविनाश कुलकर्णी यांचे व स्कूलच्या सेवकांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
या वेळी कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यूनि. कॉलेजच्या प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे, उलवा विद्यालय चेअरमन शरद खारकर, ‘रयत’चे रायगड विभागीय पीआरओ बाळासाहेब कारंडे, दिनेश सासवडे यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
हा पुरस्कार नाविन्यपूर्ण शिक्षण आणि मूल्य आधारित शिक्षणाद्वारे भविष्यासाठी विदयार्थी घडविण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळकटी देईल. तसेच शैक्षणिक उत्कृष्ठता आणि सर्वांगीन विदयार्थी विकासासाठी आमची सर्वांची सामुहिक वचनबद्धता प्रतिबिंबित करतो, असे प्राचार्य अविनाश कुलकर्णी यांनी अभिनंदनाच्या वेळी आश्वासित केले आहे.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper