Sunday , February 5 2023
Breaking News

उरणच्या कराटेपटूंची राष्ट्रीय स्तरावर निवड

उरण : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील कोळखे येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत उरण व केळवणे येथील गोशीनरियु कराटेपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांची बंगळुरूत होणार्‍या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत शुभम नितीन ठाकूर, कक्षा रमेश म्हात्रे, आर्वी निवृत्ती केदारी, यश जितेंद्र पाटील, मिथिल पाटील यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण, मानसी नितीन ठाकूर, अमिता अरुण घरत, अमिषा अरुण घरत, विघ्नेश विशाल पाटील, तमन्ना दीपक गावंड, समिक्षा समीर पाटील, ऋतुराज माळी, सोनाली भौमिक प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्य, श्रेया चंद्रशेखर म्हात्रे एक सुवर्ण व एक कांस्य, आयुष महेंद्र पाटील, ओम समीर पाटील, समिक्षा पवार सुवर्ण, श्लोक योगेश ठाकूर, गायत्री योगेश म्हात्रे, अर्णव पाटील, मंथन म्हात्रे प्रत्येकी दोन रौप्य, अमर अरुण घरत, स्मिथ म्हात्रे एक रौप्य व एक कांस्य, हंसी ठाकूर, तन्वीर पाटील प्रत्येकी एक रौप्य, सृष्टी हेमंत ठाकूर, भाविक रोहिदास पाटील दोन कांस्य आणि युवराज म्हात्रे याने एक कांस्यपदक पटकाविले. यशस्वी कराटेपटूंना सिहान राजू कोळी, मधू पाटील, गोपाळ म्हात्रे, राकेश म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले. या सर्वांचे अभिनंदन होत आहे.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply