Breaking News

सुधागडातील मोबाइल टॉवर्स सील

महसूल विभागाची कारवाई; थकबाकीदार कंपन्यांना शिकवला धडा

पाली : प्रतिनिधी

मोबाइल कंपन्यांच्या सुधागड तालुक्यातील एकूण 11 टॉवर्सला  महसूल प्रशासनाने 1 आणि 3 फेब्रुवारीला सील लावले आहे. तालुक्यातील प्रत्येक मोबाइल टॉवर कंपनीकडे 51 हजार 950 म्हणजे एकूणच चार लाख 67 हजार 550 रुपयांची थकबाकी होती. आदिवासीबहुल सुधागड तालुक्यात मोबाइल नेटवर्क व इंटरनेटच्या सुविधेची नेहमीच बोंबाबोंब असते, मात्र नफा कमविण्याच्या नादात मोबाइल कंपन्या महसूल थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष करीत होत्या. दरम्यान, सुधागड महसूल विभागाने वसुलीसाठी कंबर कसली आहे. वसुली वाढविण्यासाठी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. काही महिन्यांपूर्वी महसूल कार्यालयाने थकबाकी वसुलीसाठी तालुक्यातील 11 मोबाइल टॉवर्स कंपन्यांना नोटीस दिली होती. त्यानंतरही संबंधित कंपन्यांकडून करवसुली न झाल्याने महसूल विभागाने तालुक्यातील सर्वच मोबाइल टॉवर्स कंपन्यांवर कारवाई करण्याचे सत्र सुरू केले आहे. याशिवाय जांभूळपाडा, पेडली येथील मोबाइल टॉवर्स 3 फेब्रुवारी रोजी सील करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून महसुलाची 51 हजार 950 रुपयांची रक्कम भरण्यास टाळाटाळ केली जात होती.

सील केलेले मोबाइल टॉवर

कंपनी                                    ठिकाण

रिलायन्स                             पाली

इसार वोडाफोन                    पाली

आयडिया                              पाली

टाटा इंडिकॉम                      पाली

टॉवर विजन                         पाली

एअरटेल                                पाली

इसार वोडाफोन                    झाप

टाटा इंडिकॉम                      पाली

इसार वोडाफोन                    उन्हेरे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply