माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाची अनेक कामे मतदारसंघात सुरू आहेत. त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून रोडपाली सेक्टर 20 येथील उद्यानात ओपन जिम उभारण्यात आली असून या जिमचे लोकार्पण महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 13)
झाले. या वेळी परेश ठाकूर यांनी कळंबोली हे येत्या काळात स्मार्ट शहर म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
पनवेल महापालिका आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलचा विकास होत असून अनेक कामांचा शुभारंभ होत आहे. त्या अंतर्गत रोडपालीतील उद्यानात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून ओपन जिमचे साहित्य देण्यात आले होते.
या ओपन जिमचे लोकार्पण महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. जिम लोकार्पण सोहळ्यास भाजपचे कळंबोली शहर मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, बबन मुकादम, महिला मोर्चा शहराध्यक्षा मनीषा निकम, दुर्गा सहानी, प्रियंका पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.