Breaking News

राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत मोरे, अपूर्वाला जेतेपद

जळगाव : प्रतिनिधी

येथील श्री शिव छत्रपती जिल्हा क्रीडा संकुलात खेळल्या गेलेल्या 48व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला सेट गमाहूनही खेळणारा विद्यमान विश्वविजेता प्रशांत मोरे (रिझर्व्ह बँक)ने अंतिम सामन्यात एअर इंडियाच्या संदीप दिवेचा चुरशीच्या लढतीत  16-25, 25-10, 25-07 असा पराभव केला. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात विद्यमान विश्वविजेती व विद्यमान आंतरराष्ट्रीय फेडेरेशन कप विजेती एस. अपूर्वा (एलआयसी)ने माजी विश्वविजेती रश्मी कुमारी (पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्ड)चा दोन सरळ सेट्समध्ये पराभव केला. पुरुष वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शब्बीर खानने तामिळनाडूच्या सुरेंद्र बाबूचा 18-14, 25-00 असा सहज पराभव करून आपल्या वर्चस्वाची ग्वाही दिली. महिला वयस्कर गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या शोभा कामतने महाराष्ट्राच्याच माधुरी तायशेटेचा 25-04, 25-13 असा सहज पराभव करून आपल्या नावे सातव्या राष्ट्रीय अजिंक्यपदाची नोंद केली. या स्पर्धेत एकूण 41 व्हाईट स्लॅम्स व आठ ब्लॅक स्लॅम्सची नोंद झाली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply