Breaking News

पर्यटकांची संख्या रोडावली

जंजिरा किल्ल्यावर शुकशुकाट

मुरूड : प्रतिनिधी

सुटीचे दिवस असतानाही सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे एरवी गजबजलेल्या राजपुरी व खोरा बंदरात शनिवार, रविवारी शुकशुकाट व  कमालीची शांतता दिसून आली. पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे शिडाच्या बोटींचा धंदा ठप्प झाला आहे. होड्या सज्ज आहेत, परंतु पर्यटक नाहीत असे चित्र पाहावयास मिळत आहे. खोरा बंदराकडे तर रविवारी एकही पर्यटक फिरकला नाही. त्यामुळे यांत्रिक बोटी बंद ठेवण्यात आल्या होत्या. राजपुरी बंदरातसुद्धा तीच परस्थिती दिसून आली.  ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त पर्यटक येतात, परंतु शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशीही पर्यटकांनी पाठ फिरवल्याने येथील व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

मुरूड हा पर्यटन तालुका असून, येथील सर्व व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून आहेत, मात्र यंदा अजूनही पर्यटक येत नसल्याने येथील हॉटेल, लॉजिंग व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. पर्यटकांची संख्या रोडावल्यामुळे मासळीची विक्रीही समाधानकारक होत नाही.

-मनोहर  मकू, उपाध्यक्ष, सागरकन्या मच्छीमार संघ, मुरूड

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply