कोझिकोड : वृत्तसंस्था
केरळमधील कोझिकोड येथे शुक्रवारी (दि. 7) रात्री झालेल्या भीषण विमान अपघातातील मृतांचा आकडा 18वर जाऊन पोहोचला आहे. अनेक जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले आहेत तसेच अपघातग्रस्तांचे कुटुंबीय आणि जखमी प्रवाशांना केंद्र सरकारतर्फे मदत जाहीर केली आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी अपघातस्थळाचा दौरा करून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, गंभीररित्या जखमी झालेल्या प्रवाशांना दोन लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मृतांपैकी दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
या विमान अपघातानंतर चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. विमान अपघातात मरण पावलेल्या 18 प्रवाशांपैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर अपघातानंतर मदतकार्यात असलेल्या सर्वांना क्वारंटाइन होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Check Also
लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…
काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …
RamPrahar – The Panvel Daily Paper