केपटाऊन : वृत्तसंस्था
जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष रविवारी (दि. 9) होणार्या 19 वर्षांखालील विश्वचषकातील अंतिम सामन्याकडे लागले आहे. विश्वविजेतेपदासाठी भारत आणि बांगलादेश हे दोन आशियाई संघ मैदानात उतरतील.
भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाने जर विजय मिळवला, तर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित विश्वचषक स्पर्धेचे विक्रमी पाचवे विजेतेपद ठरले. अंतिम सामन्यात भारतीय संघच फेव्हरेट मानला जात आहे. तरी बांगलादेशला कमजोर मानता येणार नाही. या संघाने याआधी अनेकांना धक्के दिले आहेत. उपांत्य फेरीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडविला होता, तर बांगलादेशने न्यूझीलंड संघाला धक्का दिला आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …